fbpx

धनगर आंदोलकांची गांधीगिरी, एसटीला थांबवून केली पूजा

टीम महाराष्ट्र देशा – सध्या कोणतंही आंदोलन असलं कि सर्रासपणे एसटी बसवर दगडफेक केली जाते. मात्र सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला असतांना नगर जिल्ह्यातील आंदोलकांनी केलेली गांधीगिरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

आरक्षणासह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, अमरावती, अकोला, सांगली, चंद्रपूर कोल्हापूर अशा सर्वच ठिकाणी सोमावरी आंदोलकांनी रस्ता केला . मात्र या सर्वामध्ये जामखेड फाटा येथील आंदोलकांच्या एका विशेष कृत्याची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही घेतली.

काल संपूर्ण मराठवाड्यामध्ये धनगर आरक्षणावरून आंदोलने आणि रस्ता रोको केला जात होते. मात्र अहमदनगरमधून जाणाऱ्या अहमदनगर-बीड राज्य महामार्गावर असणाऱ्या जामखेड फाटा येथे धनगर समाजाच्या आंदोलकांनी रस्तारोको न करता वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. जामखेड फाटा येथून जाणाऱ्या एका एसटी बसची आंदोलकांनी चक्क पूजा केली.

या एसटीला थांबवून आंदोलकांनी तिची पूजा करुन, भंडारा उधळून तिला आपल्या मार्गाने जाऊ दिले. निषेध नोंदवण्याच्या अनोख्या पद्धतीची तसेच आंदोलकांनी केलेल्या गांधीगिरीची परिसरामध्ये दिवसभर चर्चा रंगली.

या आगळ्यावेगळ्या मात्र सकारात्मक आंदोलनाची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही घेतली असून त्यांनी या आंदोलकांचे आभार तर मानलेच पण या कृतीसाठी त्यांनी आंदोलकांचे विशेष अभिनंदनही केल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल ; दिवाकर रावतेंचा संघाला टोला

३५० जागांचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यांवर लक्ष द्या – दिवाकर रावते