‘महात्मा गांधी महिलांनी तर मोहन भागवत पुरुषांनी घेरलेले’; राहुल गांधीनी उडवली खिल्ली

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आरएसएस कार्यकर्त्यांची टीका

नवी दिल्ली: काँग्रेस आणि संघ हे नेहमी एकमेकांच्या विरोधात असतात. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचे उदाहरण देत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांची खिल्ली उडवत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा फोटो पाहिला तर ते पुरुषांनी घेरल्याचे दिसून येतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. मेघालयमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते.

काय म्हणाले राहुल गांधी ?
आरएसएसचे विचार महिलांविरोधात आहेत. आरएसएसचा विचार महिलांना शक्तिहीन बनवण्याचा आहे. आरएसएसच्या कोणत्याच पदांवर महिला नाहीत. महात्मा गांधी यांचे फोटो पाहिले तर त्यांच्या दोन्ही बाजूला महिला दिसतात. मात्र जर तुम्ही आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा फोटो पाहिला तर ते पुरुषांनी घेरल्याचे दिसून येतात.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आरएसएस कार्यकर्त्यांनी त्यांचावर टीका केली आहे. इंदिरा गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये की महिला मंत्री होत्या? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आरएसएसमध्ये महिलांसाठी वेगळ्या शाखा आहेत, ज्याला राष्ट्र सेविका समिती असे म्हटले जाते असे एका युझरने म्हटले आहे.