मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे तीन तास चौकशी एजन्सीने त्यांची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राहुल गांधी सकाळी ११.१० वाजता एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले आणि पहाटे २.३० वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. दरम्यान देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयांवर जोरदार आंदोलन केले. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१० साली गांधी कुटुंबाने यंग इंडियाची स्थापना केली. या कंपनीद्वारे गांधी कुटूंबियांनी स्वातंत्र्य सैनिकांचा हक्क हिरावला आहे. या कंपनीच्या दोन हजार कोटींच्या संपत्तीवर मालकी सांगत त्यांनी संपत्ती हडप केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा डाव त्यांनी रचला आहे.” या घोटाळ्याप्रकरणी कोर्टाच्या नियमानुसार त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे, असंही ते म्हणाले आहेत.
आज फडणवीस हे मुंबईत पत्रकारपरिषेदेत बोलत होते. ते म्हणाले, आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीत चौकशी झाली आहे. काँग्रेसने आज जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. ईडीची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिक एजेएल कंपनीचे मालक होते. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने यंग इंडियन कंपनी सुरू करुन त्यावर आपली मालकी प्रस्तावित केली. त्यानंतर त्यांनी दोन हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी हडप केली. त्यामुळे हा संपू्र्ण भ्रष्टाचार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :