मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन

मानाच्या पाचव्या असलेल्या केसरीवाडा गणपतीचे आज संध्याकाळी साडेसात वाजता विसर्जन करण्यात आले. अशा तऱ्हेने पाचही गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला आता रंग चढला असून ढोल-ताशा पथकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मिरवणूक पाहण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर गर्दीचा महापूर उसळला आहे.

यंदा पुण्यात गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सावानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली.

ढोल-ताशा पथकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक मंडईतून प्रस्थान करून नंतर लक्ष्मीरोड मार्गे अलका चौकात दाखल झाली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मात्र प्रचंड उत्साहात मिरवणुकीचा जल्लोष चालू आहे. ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने मानाच्या पहिल्या असलेल्या कसाब गणपतीचे संध्याकाळी चार वाजून एक मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. साडेपाच वाजता मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गुरुजी तालीम मंडळाचा मानाचा तिसऱ्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळी सव्वा सहा वाजता झाले. तर मानाच्या पाचव्या आणि अखेरच्या केसरीवाडा गणपतीचे आज संध्याकाळी साडेसात वाजता विसर्जन करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...