fbpx

गुरुजी तालीम गणपतीचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन

guruji talim

मानाच्या तिसऱ्या गुरूजी तालीम मंडळाच्या गणपती बाप्पाचे देखील नुकतेच विसर्जन झाले आहे. गुलालाची उधळण करत तसेच ढोल ताशांच्या गजरात सकाळी विसर्जन मिरवणुकीला सकाळी 11.00 वा. सुरूवात झाली होती

गुरूजी तालीम मंडळाच्या गणपती समोर जयंत नगरकर यांचे नगारावादन,तसेच नादब्रम्ह, चेतक, शिवगर्जना ढोल ताशा पथकाचा समावेश होता . सुभाष सरपाळे व स्वप्निल सपकाळे यांनी तयार केलेल्या फुलांचा रथामध्ये ‘श्रीं’ची मुर्ती विराजमान होती.सायंकाळी ठीक.सव्वा सहा वाजता पालिकेकडून नदीकाठी बनवण्यात आलेल्या हौदात विसर्जन करण्यात आले.