शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान सांगोल्यात दगडफेक

sangola dangal

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरात अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी झाली मात्र सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या दगडफेकीत पोलीसांच्या गाड्यांसह खाजगी गाड्यांचे नुकसान झाले आहे़. या दगडफेकीत मिरवणुकीत सहभागी झालेले शिवभक्त जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे़

शिवजयंती मिरवणूक भीमनगर येथे आल्यानंतर काही समाजकंटकानी दगफेक केली. दगडफेक केल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले़ होते.या घटनेची गंभीर दखल घेवून पोलीस स्टेशन व शांतता कमिटीची भीमनगर येथे बैठक झाली़ यावेळी आ. गणपतराव देशमुख माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील आदी मंडळींनी शांततेचे आवाहन केले़ पोलीसांनी दोषींवर कडक कारवाई करावी अशा सूचना या शांतता बैठकीत करण्यात आल्या़ .

दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक डॉ. विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, सांगोला पोलीसांनी स्टेशन येथे ठाण मांडून आहेत़. शहरातील घडामोडीवर लक्ष्य ठेवण्यात येत आहेत शहरात तणावपूर्ण शांतता आहे