‘खेळ मांडला…’ संघनायकाचा बनला वॉटरबॉय; डेविड वॉर्नरची अवस्था बघून चाहते हळहळले

दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ५५ धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ केवळ १६५ धावापर्यंत मजल मारु शकला. धडाकेबाज शतकासाठी राजस्थाचा सलामीवीर जोस बटलरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

वॉर्नरला रविवारी संघातुन वगळल्याने त्याचे चाहते आधिच नाराज होते. त्यात त्याला वॉटरबॉय बनवल्याने चाहते चांगलेच भडकले. डेव्हिड वॉर्नर सामन्यादरम्यान अनेकदा मैदानात येऊन खेळाडूंना ड्रिंक, टॉवेल आणि हेल्मेट देताना दिसून आला होता. हे पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. यादरम्यानचा वॉर्नरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, यात वॉर्नर हेल्मेट धरून बसला आहे. तसेच त्याला अश्रू देखील अनावर झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा संघ सहकारी त्याला धीर देताना दिसून येत आहे.

राजस्थान विरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाने एक पत्रक जाहीर करुन वॉर्नरची कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्याची माहिती दिली होती. तर सामन्याअगोदर त्याला अंतिम ११ मध्येही स्थान दिले नाही. यानंतर वॉर्नरचे चाहते चांगलेच संतापले होते. आयपीएलमध्ये वॉर्नर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने ५० अर्धशतके पुर्ण केली आणि ५००० पेक्षा जास्त धावाही केल्या. तर तब्बल तीन वेळा ऑरेंज कॅपही पटकावली होती. तर त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते.

महत्वाच्या बातम्या