fbpx

खा.मोहिते-पाटील माढ्याचा विकास करण्यात अपयशी ठरले का ?

टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाले होते. दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघात दोन प्रमुख चेहरे समोर आले असून खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या मध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र देशाच्या गेम चेंजर या विशेष कार्यक्रमात प्रभाकर देशमुख यांनी हजेरी लावली. माढ्याच्या विकासासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतंं यावर त्यांनी सविस्तरपणे मते मांडली. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी देखील मतदारसंघाच्या विकासात मोठं योगदान दिल्याचं मान्य केलं. मात्र मी प्रशासकीय कामातील अनुभवाच्या जोरावर आपण या परिसराचा अत्यंत वेगाने विकास करू शकतो असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखविला.

कुणाला मिळणार माढ्याचं तिकीट ? जलयुक्त शिवार योजना फेल झाली आहे का ? खा.मोहिते-पाटील माढ्याचा विकास करण्यातअपयशी ठरले का ? प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीतील गटबाजी कशी रोखणार ? उमेदवारी मिळाली नाही तर प्रभाकर देशमुख बंडखोरी करणार ? या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देशमुख यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेल्या माणदेशी विकासपुरुषाची दिलखुलास मुलाखत