जुगा-यांना सोडविण्यासाठी पोलिसांना जीपसह जाळण्याची धमकी

Maharashtra-Police

हिंगोली : जुगार अड्ड्यावर पकडलेल्या जुगा-यांना सोडविण्यासाठी जमावाने पोलिसांना जीपसह जाळून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील आंबाचोंढी येथे स्थानिक गुन्हे शोध शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर हा प्रकार झाला आहे.

शासकीत कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबाचोंढी येथील रेल्वे स्थानकाजवळील बस स्थानकाच्या समोर जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती मिळताच हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

यावेळी पोलिसांना पाहून जुगाऱ्यांनी त्यांच्या साथीदारांना बोलवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींना सोडून न दिल्यास पोलिसांना जीपसह जाळण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.