fbpx

गंभीरने घेतली शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट, मुलांना दिलं मॅच पाहण्याचं निमंत्रण

टीम महाराष्ट्र देशा- टीम इंडियाचा संवेदनशील आणि देशभक्त क्रिकेटपटू गौतम गंभीरने वेळोवेळी आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलल्या नंतर आता या मुलांच्या दुखावर फुंकर घालण्यासाठी गंभीरने या मुलांना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

गंभीरने सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधून वेळात वेळ काढून, सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याआधी गंभीरने नक्षलवाद्यांनी केलेल्या सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. या भेटीनंतर गंभीरने शहीदांच्या मुलांना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.सध्या गंभीरची संस्था 12 कुटुंबातील 18 मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत आहे.