Gallery Guardian- न्यूड फोटो काढल्यास पालकांना अलर्ट देणारं ‘गॅलरी गार्डियन’ हे अॅप

‘गॅलरी गार्डियन’ असं या अॅपचं नाव आहे. आपल्या मुलाच्या स्मार्टफोनमधील न्यूड फोटो डिटेक्ट करुन या अॅपद्वारे पालकांना अलर्ट मिळू शकेल. सर्वात पहिल्यांदा हे अॅप एखाद्या फोटोमध्ये कुणी माणूस आहे का, हे पाहील. त्यानंतर फोटोतल्या माणसाची स्कीन किती आहे, हे निरीक्षण करेल. मग त्यावरुन संबंधित फोटो न्यूड किंवा आक्षेपार्ह आहे का, हे ठरवले जाईल आणि त्यानंतरच पालकांना अलर्ट मेसेज दिला जाईल.

आपली मुलं स्मार्टफोनचा गैरवापर तर करत नाही ना, याची काळजी बहुतेक पालकांना असते. त्यामुळे या अॅपद्वारे पालक आपापल्या मुलांबाबत निश्चिंत राहू शकतात. YIPO टेक्नोलॉजीने हे अॅप विकसित केले आहे. या अॅपची एक अट आहे, ती म्हणजे पालकांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप असावंच लागेल, मात्र त्याचबरोबर मुलांच्या स्मार्टफोनमध्येही अॅप असणं आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही अॅप जोडले जातील आणि अलर्ट मिळू शकतील

[jwplayer Gcqt5a1G]