fbpx

टीडीपी काँग्रेससोबत गेली तेव्हाच शापित झाली; भाजपचा पलटवार

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. मोदींनी आंध्र प्रदेशवर अन्याय केलाय, आम्ही मोदी सरकारला इशारा नाही तर शाप देतोय असं म्हणत टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, भाजप खासदार राकेश सिंह यांनी पलटवार केला. गल्ला जी तुम्ही म्हणताहात की मी शाप देतोय, तुम्ही तर काँग्रेससोबत गेलात तेव्हाच शापित झाला आहात .गल्ला यांचे भाषण ऐकल्यावर वाटले की अविश्वास प्रस्तावाची गरज नव्हती.कुठल्याही एका राज्याच्या मागण्यांसाठी संपूर्ण देशाच्या हितांचे बलिदान देता येणार नाही असं म्हणत टीडीपीवर हल्ला चढवला.तर मनमोहन सिंग म्हणाले होते की देशातील संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे, तर मोदींनी देशातील संपत्तीवर पहिला हक्क गरिबांचा असल्याचे म्हटले आहे.

सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

चर्चेसाठी कुणाला किती वेळ?

भाजप – 3 तास 33 मिनिटं

काँग्रेस – 38 मिनिटं

अण्णा द्रमुक – 29 मिनिटं

तृणमूल काँग्रेस – 27

शिवसेना- 14 मिनिटं

टीडीपी- 13 मिनिटं
तेलंगणा राष्ट्र समिती – 9 मिनिटं

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा

मला फक्त १५ मिनिटं द्या ; पंतप्रधान भाषणाला उभा देखील राहणार नाहीत – राहुल गांधी