Samsung- सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ ची सुधारित आवृत्ती

गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी नोट ७ या मॉडेलमुळे सॅमसंगला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेक युजर्सला याच्या बॅटरीत खराबी आढळून आली. तर बर्‍याच जणांच्या बॅटरीजचा चक्क स्फोट झाल्याचे समोर आले. यामुळे सॅमसंगला बदनामी सहन करावी लागली होती.  सॅमसंग कंपनी हे मॉडेल सुधारित आवृत्तीत सादर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. गॅलेक्सी नोट ७ फॅन एडिशन या नावाने याची नवीन आवृत्ती सॅमसंगने बाजारपेठेत आणली आहे असे सॅमसंगने अधिकृतपणे जाहीर केले आहे. ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची सुधारित बॅटरी देण्यात आली आहे, अधिक कार्यक्षम व सुरक्षित असेल असा कंपनीचा दावा आहे. तसेच यात अलीकडच्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या मॉडेलमध्ये देण्यात आलेला बिक्सबी हा डिजीटल असिस्टंटही देण्यात आला आहे. ५.७ इंची फुल एचडी डिस्प्ले; चार जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज तसेच १२ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे असतील.

https://youtu.be/l-Dqwcw1Sdo