Share

Shivsena | शिवसेनेत पिता-पुत्रात फुट! गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश तर चिरंजीव ठाकरे गटातच

Shivsena | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात आता शिवसेना नेमकी कोणाची?, यावरुन कीर्तीकर पिता पत्रामध्ये फुट पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे ठाकरे गटातच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गजानन कीर्तीकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत. त्यांचं शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाचं वैयक्तिक मोठं नुकसान झालंय. गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना, वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. शिंदे गटात जाण्याचा वडिलांचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं अमोस कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी हेच विधान एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आज तसंच काहीसं दृश्य बघायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला तर काहींनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. पण शिवसेनेच्या या दोन गटांची लढाई आता घरा-घरापर्यंत पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Shivsena | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात आता शिवसेना नेमकी कोणाची?, यावरुन कीर्तीकर पिता पत्रामध्ये फुट पडली आहे. शिवसेना उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now