Share

Gajanan Kirtikar | शिंदे गटात गेल्यावरही स्वत:ला निष्ठावंत कसं म्हणता?, प्रश्न विचारताच गजानन कीर्तिकर भडकले, म्हणाले…

Gajanan Kirtikar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपुर्वीच एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्यासह गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांना देखील अनेक प्रश्न विचारण्यात आली आहेत. अशातच पत्रकारांनी काही प्रश्न विचारत गजानन कीर्तिकर चांगलेच भडकले आहेत.

यावेळी, शिंदे गटात प्रवेश करुनही स्वतःला निष्ठावंत कसे म्हणता, या सवालावर कीर्तिकर भडकले. तसेच, पक्षात अन्याय होत असतानाही मी इतके दिवस गप्प राहिलो होतो. मी तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार सहन करत होतो. पण मी निष्ठावंत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे किंवा भाजप कुठल्याच पक्षात गेलो नाही. माझ्यावर अन्याय, अपमान होत असतानाही त्याच पक्षात राहिलो. कारण मी निष्ठावंत होतो, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

तू पत्रकारितेचं शिक्षण घेतलसं का? मी माहिती व प्रसारण मंत्री होतो, मला बऱ्यापैकी माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा आहे. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्त्वाच्या विचाराने चालणारी, आक्रमक आणि मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी काम करणारी आहे. मी त्याच पक्षात गेलो आहे. यामध्ये निष्ठेचा प्रश्न कुठे येतो? शिंदे गटाकडे ५० आमदार आणि भाजपकडे १०६ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेची युती शाबुत ठेवली, असा भडकाच कीर्तिकरांचा उडाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Gajanan Kirtikar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपुर्वीच एकनाथ शिंदे गटात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now