आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे: किर्तीकर

shivsena vs bjp

टीम महाराष्ट्र देशा- आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे, अशी टीका शिवसेनेचे वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे. मुबईत झालेल्या पत्रकार परिषदेत किर्तीकर यांनी भाजपवर हल्ला चढवला. राममंदिर स्थानकाचे उद्घाटन असो, वर्सोवा खाडीतील गाळ काढण्याचे काम असो किंवा गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग वाढवण्यासाठीचा पाठपुरावा असो हि सगळी काम आम्ही केली मात्र, श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली असल्याने त्यांनी पत्रक काढून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतात असं देखील किर्तीकर म्हणाले

नेमकं काय म्हणाले किर्तीकर ?
राममंदिर स्थानकाचे उद्घाटन असो, वर्सोवा खाडीतील गाळ काढण्याचे काम असो किंवा गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग वाढवण्यासाठीचा पाठपुरावा असो या सर्व कामांसाठी मी स्वतः अनेक महिने पाठपुरावा केला . मात्र काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले की भाजपचे लोकप्रतिनिधी पत्रक काढून त्याचे श्रेय लाटतात. साडेतीन वर्षे आम्ही हे दुखणे सहन करीत आहोत, अशी खंतही कीर्तिकर यांनी व्यक्त केली. अगदी ट्रम्प जरी काहीही बोलले, तरी पंतप्रधानांची त्यांच्याशी मैत्री आहे, असे सांगून भाजप त्याचे श्रेय घेते, असा टोलाही त्यांनी लगावला.