मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे विश्वासू नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार एवढेच नव्हे तर मंत्र्यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेशी बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या पाठिंब्याच्या जोरावर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनतर आता शिवसेना या धक्क्यातून सावरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने राज्यात निष्ठा यात्रा सुरु केली आहे. यावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटे नवाब’ असा केला आहे.
गजानन काळे म्हणतात, “दुसऱ्याला संपलेला पक्ष म्हणता म्हणता छोटे नावाब यांचा पक्ष आता महाराष्ट्र नावाला तरी शिल्लक राहणार आहे की नाही असे चित्र निर्माण झाले आहे. लोक पक्षातच राहावे म्हणून छोटे नवाब यांनी निष्ठा यात्रा सुरू केली. मात्र त्याचे उलटे परिणाम झाले. आमदार गेले, नगरसेवक गेले आणि आता पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी सुद्धा यांना सोडून जाऊ लागले आहेत. मला वाटते आता निष्ठा यात्रा बंद करून छोटे नवाब यांनी राहिलेल्यांसाठी ‘शिल्लक यात्रा’ काढावी”.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी बांधणार ‘लग्नगाठ’; सोशल मीडियावर तुफान चर्चा
- Virat Kohli | BCCI चा मोठा निर्णय! टीम इंडियातून विराट कोहलीची हकालपट्टी?
- Sanjay Raut : औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला?, नामांतर निर्णय स्थगितीवरून संजय राऊतांचा सवाल
- Breaking News : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<