Share

MNS on Ajit Pawar | “दया कुछ तो गडबड है…” ; मनसेची अजित पवारांवर खोचक टीका

MNS on Ajit Pawar  | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीतील सर्व नेते सत्तारांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे.

“महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र महाराष्ट्रातील शॉडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटले जाते ते विरोधी पक्ष नेते अजित  पवार काही दिवसापासून शांत असल्याचे आपण बघितले. इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात तब्येत बरी नसताना शरद पवार उपस्थिती लावतात. मात्र काही वयक्तिक कारण सांगून अजित पवार हे अनुपस्थित होते. दया कुछ तो गडबड है,  एवढे मात्र नक्की”, असे गजानन काळे म्हणाले.

“काल परवा अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळे यांच्यावर इतक्या गलिच्छ भाषेत, शिवराळ भाषेत बोलतो. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या ट्विटर अकाउंटवर सुध्दा याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या मीडियाला सुध्दा अजित पवार यांनी निषेध नोंदवला आहे, हे दिसत नाही”, अशी प्रतिक्रया गजानन काळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

MNS on Ajit Pawar  | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now