अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करणारा गजाआड

औरंंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेत, मंदीरात लग्न लावून तिच्यावर बळजबरी बलात्कार करणाऱ्या नितीन उर्फ नितेश लाला जाधव (वय ३६, रा. माजलगाव जि. बीड) याला एमआयडीसी पैठण पोलिसांनी माजलगाव येथून अटक केली. अटकेत असलेल्या नितीन उर्फ नितेश जाधव याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी बुधवारी (दि.९) दिले.

प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, फिर्यादी हे गाव सोडून मासेमारीसाठी पैठण येथे कुटूंबासह राहण्यासाठी आले होते. १४ मे रोजी रात्री फिर्यादी हे पत्नीसह मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी पीडिता व तीचे लहान भाऊ बहिण होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे घरी आले असता त्यांना पीडिता ही घरी दिसली नाही. प्रकरणात एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन पीडितेला माजलगाव येथून ताब्यात घेतले तर नितीन उर्फ नितेश जाधव याच्या मुसक्या आवळल्या.

पीडितेने जबाब दिला की, १४ मे रोजी नितीन उर्फ नितेश जाधव याने  पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवर पळवून नेले. त्यानंतर त्याने पीडितेला घेवून पोकळवाडी येथे राहणाऱ्या बहिण व मेव्हण्याच्या घरी गेला. व आमचे लग्न झाले असून आम्हाला राहण्यासाठी खोली भेटेपर्यंत येथे राहुद्या अशी विनवणी केली. दुसऱ्या दिवशी नितीन उर्फ नितेश याने पीडितेला मंदीरात घेवून गेला व तेथे एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न केले. त्याच रात्री नितीन उर्फ नितेश जाधव याने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला.  नितीन उर्फ नितेश जाधव याने आठवडाभर पीडितेवर बलात्कार केला. प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP