समृद्धी महामार्गाचे बांधकाम साहित्य चोरणारा गजाआड; हजारोंचा मुद्देमाल जप्त

समृद्धी महामार्गाचे बांधकाम साहित्य चोरणारा गजाआड; हजारोंचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद : चिमनपूरवाडी येथे चालू असलेल्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या एकाला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संजय नथू मुळे रा. नायगाव असे आरोपीचे नाव आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुढकार घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, समृद्धी महामार्गाच्या एका पुलाचे काम चिमनपूरवाडी जवळ सुरु आहे. त्यासाठी मोठ्याप्रमाणात त्या परिसरात बांधकाम साहित्य ठेकेदाराकडून आणण्यात आले आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तयार होत असलेल्या पुलाजवळून लोखंडी सळ्या, गजाचे तुकडे, लोखंडी जॉक, लोखंडी चायनल, फावडे असे हजारो रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. हि घटना सोमवारी कामगार काम सुरु करत असताना. समोर आली होती.

दरम्यान, सर्व चोरी गेलेल्या साहित्याची शहानिशा करून ठेकेदार हबीब भुरा रहेमान वय २६ रा. ओव्हरगाव, जटवाडा यांनी हर्सूल पोलीस ठाणे गाठत, तक्रार दिली. त्यावरून हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी जात तपासाची चक्रे फिरवत, संजय मुळे याला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्याचे सफौ साखळे हे पुढील तपास करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या