पक्षावर दबाव निर्माण करण्यासाठी गायकवाड यांनी तुळजाभवानी दर्शन घेवून केला प्रचार सुरु

टीम महाराष्ट्र देशा – सेनेचे खासदार रवि गायकवाड यांनी तुळजाभवानी दर्शन घेवून प्रचार सुरु केला आहे . या माध्यमातून गायकवाड यांनी पक्षावर दबाव निर्माण केला आहे.

युती झाली आणि उस्मानाबाद लोकसभेचू जागा शिवसेनेकडे असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

सेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवि गायकवाड यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन उमेदवारी जाहीर झालेली नसताना प्रचार सुरू करुन, ऐक प्रकारे पक्षावर उमेदवारी देण्यासाठी दबाव निर्माण केल्याची चर्चा राजकीय पटलावर होत आहे.
उस्मानाबाद लोकसभेसाठी शिवसेनेत अनेक जण इछुक आहेत. त्यात सेनेचे नेते आ.तानाजी सावंत, माजी आ. ओमराजे निंबाळकर, उद्योगपती शंकर बोरकर यांच्यासह अनेक दिग्गज असताना प्रचाराचा प्रारंभ श्रीतुळजाभवानी दर्शन घेवुन सुरु केला.यामुळे खुद्द शिवसैनिकात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading...

शिवसेनेचे विद्यमान खा. रवि गायकवाड यांच्या कामकाजा बाबतीत जिल्हयातील लोक समाधानी नाहीत. त्यांनी ठोस असे ऐकही विकास कामकेलेले दिसत नाही.
२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर गायब झालेले गायकवाड हे निवडणूक येताच अचानक सक्रिय झाल्याची चर्चा आता होवू लागली आहे .

जिल्हयात उमरगा-लोहारा या एकमेव तालुक्यात सेनेचा आमदार आहे. उर्वरीत ठिकाणी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. भुम-परांडा-कळंब मध्ये सेनेचा थोडासा प्राभाव आहे.

सेनेकडे मतदार संघ गेल्याने भाजपा या जागेवर उमेदवार देणार म्हणून भाजपात प्रवेश केलेल्या इछुकांच्या प्रयत्नावर पाणी फिरले आहे. मागील वेळी भाजपाचा आक्रमक प्रचार नितीमुळे व नरेंद्र मोदीचा हवेमुळे सेनेचे खासदार रवि गायकवाड विक्रमी मतांनी निवडून आले होते. माञ आता पाच वर्षनंतर परिस्थिती पूर्णता बदलेली आहे. त्यामुळे सरांचा यात निभाव लागेल का ?अशी शंका व्यक्त होत आहे.

आघाडीत जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांना गायकवाड यांच्या उमेदवारी बाबतीत आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.