गुवाहाटी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून 30 जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र या बहूमत सिद्ध करण्याच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. कोर्ट आज संध्याकाळी 5 वाजता यावर सुनावणी करेल. तर गुवाहाटीला सर्व आमदार कामख्या देवीचे दर्शन घेऊन गोव्याला निघणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर बंडखोर गटाते नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोनतृतियांशपेक्षा जास्त बहुमत आमच्या शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत आम्ही पास होणार आहोत. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी देखील आम्ही जाणार आहे. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. या देशात राज्यघटना आणि कायद्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही.”
उद्या विशेष अधिवेशन
शिंदे गटात 49 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात असलेलेल सध्याचे महाविकास आघाडी सरकार आल्पमतात आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत राज्यपालांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. 30 तारखेला अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होईल. ठाकरे सरकारला सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ शुटींग करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर कोणताही विलंब होऊ नये आणि अधिवेशन स्थगित करू नये, असे आदेशही राज्यपालांनी दिले आहे. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यात 6 अटी देखील घातल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<