गरीबांच्या विकासाचा गडकरींनी सांगितला मार्ग, वाचायलाच हवे हे वृत्त

nitin-gadkari

नागपूर :  नवीन संशोधन, उद्योजकता, विज्ञान, कौशल्य, यशस्वी प्रयोग हेच ज्ञान आहे. या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करता आले पाहिजे. आपल्या देशातही विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे. त्याला प्रोत्साहन देणे आमचे काम आहे. रोजगार निर्मिती ही आमच्या अर्थव्यवस्थेची प्राथमिकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास, कृषी मालावर आधारित उद्योग, मागास भागाचा विकास, गरिबांचा विकास, हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे, असेही गडकरींनी यावेळी सांगितले.

देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागाच्या विकासासाठी आपण काम केले पाहिजे. देश, समाज, गरीब यांच्यासाठी काम करण्यास मी प्राधान्य दिले आहे. आपल्या कामांना जनतेची पावती मिळाली पाहिजे असे काम आपल्या हातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘या’ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री नाराज, तर कृषिमंत्री झाले नाखूश

विश्‍व सिंधी सेवा संगमच्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. उद्योजकतेत सिंधी समाजाचे खूप प्रगती केली आहे, असे सांगताना एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले, महामार्ग बांधणीमध्ये एवढे काम देशात झाले आहे की येत्या दोन वर्षात युरोपसारखे मार्ग देशात पाहायला मिळतील. याशिवाय मुंबई-दिल्ली हा राष्ट्रीय हरित महामार्ग १२ पदरी सिमेंट रस्ता बांधला जात आहे. याशिवाय २२ हरित महामार्ग आम्ही बनवत आहोत.

निरोगी जीवनासाठी राज्यातील ‘या’ मंत्री महोदयांनी दिला रानभाज्या खाण्याचा सल्ला

वाराणसी-हल्दीया हा १३00 किमीचा जलमार्ग आम्ही पूर्ण केला आहे. अलाहाबाद ते वाराणसी हा जलमार्गही पूर्ण झाला आहे. सिंधी समाजातील परदेशात असलेल्या उद्योजकांनी तेथील तंत्रज्ञान येथे आणून, विविध डिझाईन आणून येथे संशोधन व तंत्रज्ञान विकसित करून देशाची निर्यात वाढवावी, असेही ते म्हणाले.

देवाच्या दारात मोहोळ भाजपमधील दुहीचे ‘दर्शन’; एकाच विषयावर, एकाच दिवशी, एकाच पक्षाची दोन स्वतंत्र आंदोलने

हरित राष्ट्रीय महामार्ग बांधताना झाडांची कटाई आता होणार नाही, झाडांचे प्रत्यारोपण करण्याचे निर्देश आपण दिले असल्याचे सांगताना गडकरी यांनी सांगितले की, विविध तंत्रज्ञानाचा विकास करणे आता शक्य आहे. हरित तंत्रज्ञानाचा उपयोग महामार्ग निर्मिती करताना करणार. जेथे झाडेच नाही तेथे बांबू लावणार. कारण बांबू आमच्या रोजगाराचे साधन होऊ शकतो. कृषी क्षेत्राला जैविक इंधनाच्या क्षेत्रात परिवर्तित करणे आता आवश्यक झाले आहे.