केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पाया पडल्याचे झाले अखेर सार्थक; ढोबळे भाजपात

सोलापूर – (सूर्यकांत आसबे ) – मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी कापल्यानंतर राष्ट्रवादीपासून दुरावलेले माजी मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर सोमवारी जालना येथे भाजपच्या प्रदेश बैठकीत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून भाजपचे कमळ हातात घेतले. ढोबळे यांच्या भाजप प्रवाशानंतर सोलापूर लोकसभा निवडणुकीत ढोबळे भाजपचे उमेदवार असतील काय? या चर्चेला राजकीय वर्तुळातून उधान आले आहे.

लक्ष्मणराव ढोबळे एकेकाळी राष्ट्रवादी पक्षातील वजनदार नेते होते.त्यानंतर ते मंत्री झाले.मंगळवेढ्याचे आमदार , मोहोळचे आमदार आणि मंत्रीसुद्धा ते होते. त्यांनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकही लढविली होती.तर मोहोळमधून राष्ट्रवादीने त्यांचे तिकीट कापून त्यांचेच शिष्य असलेले आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. तिकीट कापले असतानासुद्धा त्यांनी बंडखोरी करून मोहोळमधून निवडणूक लढवली मात्र त्यांना त्याठिकाणी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ढोबळे हे मोठ्या पवारसाहेबांपेक्षा छोटे पवार अर्थात अजित पवार यांच्यावर नाराज होते.सातत्याने त्यांना डावलले जात असल्याने गेल्या पाच वर्षापासून ते राष्ट्रवादीपासून दुरावले होते.याशिवाय मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याच्या आरोपानंतर त्यांची मोठी कोंडी झाली होती.त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी ढोबळे यांनी मोठा आटापिटा केला. या केसचा निकाल नुकताच त्यांच्या बाजूने लागला आहे.

Loading...

दरम्यानच्या काळात ते भाजप नेत्यांच्या जवळ येऊ लागले.विमानतळ असो किव्वा कार्यक्रम ढोबळे सर तेथे असायचेच . पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी त्यांनी भेटीगाठी करून भाजपात येत असल्याचे सूतोवाच केले होतेच.मात्र काही अडचणींमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला खो बसत होता.काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात आल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी लक्ष्मण ढोबळे यांनी गडकरी यांचे पाय धरल्याने फोटो व्हायरल झाले होते.त्यामुळे ढोबळे कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करतील असे सर्वांनाच वाटत होते.आणि अखेर सोमवारचा मुहूर्त साधत त्यांनी जालना येथे भाजपात प्रवेश करत चर्चेला पूर्णविराम दिला.

दरम्यान आपण जरी भाजपात प्रवेश करणार असलो तरीसुद्धा सामान्य कार्यकर्ता आणि भाजपचा सदस्य म्हणून राहणार असल्याचे ढोबळे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. परंतु सोलापूर लोकसभा निवडणुकीत यंदा विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डच्चू मिळणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने ढोबळे यांना भाजप सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तरी उतरविणार नाही ना ? याबाबत मात्र राजकीय वर्तुळातून चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका