गडकरींकडून पक्षातील नेत्यांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला

नितीन गडकरी

नवी दिल्ली :– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पक्षातील असणाऱ्या तोंडळ नेत्यांना मिडीया  समोर तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राफेल प्रकरणाच्या संदर्भात 70 पत्रकार परिषद घेताना त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना शब्दांनी फटकारले.

‘आमच्या जवळ असे अनेक नेते आहेत कि ज्यांना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते त्यामुळे त्यांना आता दुसऱ्या कामात व्यस्त करण्याची गरज आहे’ ,असे देखील गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांचा  , गप्प राहण्याचा आदेश हा हनुमानाची जात आणि राहुल गांधींचं गोत्र विचारणाऱ्यांसाठी आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी 1972मधल्या हिंदी चित्रपट बाँबे टू गोवामधील एका दृश्याचा उल्लेख केला आहे. ज्यात आई-वडील मुलांना खाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा घालतात. आमच्या पक्षातील काही लोकांना अशाच प्रकारच्या कापडाच्या गोळ्याची गरज आहे. नंतर त्यांनी ते सर्व मस्करीत बोलल्याचं सांगत बाजू मारून नेली.Loading…
Loading...