गडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण

'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? : गडकरी

मुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय ‘मल्ल्याजी’ चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नितीन गडकरींच्या या विधानानं मल्ल्याच्या प्रत्यार्पणात अडचणी येणार आहेत. मल्ल्याला कधीही भारतात आणलं जाऊ शकतं. तसेच मल्ल्याच्या अटकेसाठी ‘ईडी’ आणि सीबीआय प्रयत्नशील आहेत.

विजय मल्ल्या भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पसार झाला. लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्यावरील प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे थकित कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही अश्या पार्श्वभूमीवर एखादा दुर्मिळ अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यावसायिकाला ‘घोटाळेबाज’ म्हणणे योग्य नाही असे सांगत गडकरींनी मल्ल्याला क्लीन चिट दिली आहे.

You might also like
Comments
Loading...