fbpx

‘गडकरी’ हा लघुपट लवकरच प्रेश्रकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती सध्या प्रेश्रकांचा खूप आवडीचा विषय ठरत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवास आधारीत ‘नमो’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरील ‘रा गा’ हा ही सिनेमा लवकरच सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे , दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या जीवनावरील ठाकरे सिनेमाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ही सिनेमाला चांगले यश मिळाले.त्याच जोडीला आता नितीन गडकरींचा या जीवनावर आधारीत ‘गडकरी’ हा लघुपट प्रेश्रकांच्या भेटीला येत आहे. लहानपणापासून ते २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा राजकीय प्रवास या लघुपटातून प्रेश्रकांना दाखवण्यात येणार आहे.

लघुपट रुपेरी पडद्यावर नाही तर फक्त डिजीटल माध्यमाद्वारे पाहता येणार आहे. ‘गडकरी’ या लघुपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. आणि २८ फेब्रुवारीला तो युट्यूबवर अपलोड करण्यात येणार आहे. नयनराज प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी हा एक तासाचा लघुपट तयार केला आहे.राहुल चोपडा यांनी नितीन गडकरींची भूमिका साकारली आहे. प्रेश्रकांची किती पसंती गडकरी लघुपटास मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल .

3 Comments

Click here to post a comment