fbpx

आम्ही जिंकलो की ईव्हीएम खराब, दुसरे जिंकले की चांगलं कसं? गडकरींचा विरोधकांना सवाल

पुणे – आज पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ईव्हीएम वरून आरोप करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य केलं. आम्ही जिंकलो की ईव्हीएम खराब आणि दुसरे जिंकले की चांगलं कसं? असा सवाल उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला.भंडारा गोंदिया मध्ये मतदान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल ईव्हीएम च्या विरोधात बोलत होते आता जिंकल्यानंतर ते गप्प आहेत असंगडकरी म्हणाले.

केंद्र सरकारच्या चार वर्षातील योजना, विकास कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.आमच्यावर घटना बदलणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जातात मात्र आजपर्यंत कॉंग्रेसने 72 वेळा घटना बदलली असा सणसणीत टोला गडकरी यांनी कॉंग्रेसला लगावला.निवडणुका आल्यावर जातीयवादाची भीती निर्माण केली जाते.पुण्याजवळ घडलेली घटनेचा उल्लेख करत जातीयवादाचं राजकारण करणाऱ्यांवर गडकरींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.