… आणि गडकरी चक्कर येऊन कोसळले

टीम महाराष्ट्र देशा-  केंद्रीय मंत्री  नेते नितीन गडकरी अहमदनगरमधील राहुरी इथे चक्कर येऊन कोसळले. नितीन गडकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. पण कार्यक्रमादरम्यान  गडकरी यांना चक्कर आल्याने ते कोसळले.

अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठात आज पदवीदान समारंभ  कार्यक्रमासाठी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यानच कार्यक्रमस्थळी त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. गडकरी कोसळल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

You might also like
Comments
Loading...