fbpx

गडचिरोली भ्याड हल्ला : संतप्त उदयनराजे म्हणतात …

udyan raje bhosale1

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात आपले १६ जवान शहीद झाले. सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. निवडणुकींच्या काळातही सरकारला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवता येत नाही. सरकारची यंत्रणा कुचकामी असल्याचे पुन्हा सिद्ध होतेय अशी टीका भोसले यांनी केली आहे.

दरम्यान, C-६०  पथकाच्या जवानांवर झालेला हल्ल्यासंदर्भात माहिती देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती लिक झाली. ही माहिती बाहेर कशी गेली याचा शोध घेऊ. हे युद्धच आहे आणि त्याच आमची बाजू सरस असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे देखील केसरकर म्हणाले.