गडचिरोलीचा ‘प्रोजेक्ट मुंबई’ शी करार, आदिवासी लसीकरण ध्येय साधणार, राजेश टोपेंची माहिती

गडचिरोली: जिल्ह्यातील आदिवासी पाड्व्यापर्यंत पोहचून त्यांचे लसीकरण व्हावे या हेतूने गडचिरोली जिल्ह्याने ‘प्रोजेक्ट मुंबई’शी करार केला आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सहभागासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला. अशी माहिती महाराष्ट्र शासन जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटरवर देण्यात आली आहे.

राज्यात अजूनही काही भागात लसीकरण झालेलेल नाही .त्यात गडचिरोली जिल्हा आदिवासी भाग असून या जिल्ह्यात आदिवासींनी लसीकरणाला प्रोत्साहन द्यावे,या भागात लसीकरण व्हावे. या हेतूने ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेसोबत करार करण्यात आल्याचे कळते आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत ४ कोटी नागरिकांनी लसीकरण केले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर दिली आहे. दरम्यान काही भागात लसीकरणाला प्रोत्साहन भेटण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा करार असे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या