fbpx

गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान

naxal

गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अहेरी भागात पोलिसांच्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केलं.अहेरी तहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

सकाळी सातच्या सुमारास कल्लेड गावाजवळील झिंगानूर जंगलात नक्षलवादी आणि सी- ६० कमांडो यांच्यात चकमक झाली. यात कमांडोंनी सात नक्षलवाद्यांना ठार मारले.‘पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी’चा स्थापना सप्ताह सुरू असून या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, आंध्रप्रदेश व तेलंगणा या भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या बस्तर, कांकेर व जगदलपूर या भागातील नक्षली गडचिरोलीत मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता सी-६० पथकाला तैनात करण्यात आले होते. याच पथकाला हे यश मिळाले आहे.

2 Comments

Click here to post a comment