fbpx

गडचिरोलीत कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु

टीम महाराष्ट्र देशा : गडचिरोलीत झालेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर म्हणून लष्करातर्फे जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे.

गडचिरोतील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात खासगी वाहनातून सी-६० कमांडो जवानांचा ताफा जात होता. यावेळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला आणि ताफ्यातील १५ जवान व खासगी वाहनाचा चालक शहीद झाले. या घटनेच्या तपासाला आता सुरुवात झाली आहे. या परिसरात लष्कराकडून कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक बंद करण्यात आली आहे. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत होईल.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘गडचिरोलीत काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचं राजकारण करु नये. तसेच यावेळी देशातील सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे,’ असं आवाहन केलं आहे.