गब्बरचा नवा विक्रम; पुन्हा ओलांडला ४००चा टप्पा

ipl

अबू धाबी : पहिल्या लीगमध्ये पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर धावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने काल सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट्सनी  विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सला हैद्राबादकडून विजयासाठी 135 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, त्यांनी 13 चेंडू शिल्लक असताना 8 गडी राखून सहज विजय मिळवला. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नव्हती कारण पृथ्वी शॉच्या रूपात पहिला विकेट लवकर गमावला. पण त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून विजयाचा पाया रचला.

या मॅचमध्ये खेळताना दिल्लीच्या शिखर धवनने पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. शिखर धवनने यावेळी आठ वेळा आयपीएलच्या एका हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सलग सहाव्यांदा ही कामगिरी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये शिखर धवनने ४०० धावांचा टप्पा ओलांडला.

आयपीएलच्या एका हंगामात ४०० किंवा जास्त धावा करण्याचा पराक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने सर्वाधिक नऊ वेळा ही कामगिरी केली आहे. शिखर धवनने यंदा आठव्यांदा ही कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांनी ही कामगिरी प्रत्येकी सात वेळा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या