भारताला सापडला नवा लसिथ मलिंगा

टीम महाराष्ट्र देशा- सध्या तामिळनाडू प्रिमियर लीगचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेतील एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे. हे नाव म्हणजे जी. पेरियास्वामी आपल्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजीच्या शैलीमुळे तो चर्चेत आला आहे. पेरियास्वामीला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना श्रीलंकेच्या लसिथ मालिंगाची आठवण येत आहे.

पेरियास्वामी यंदाच्या मोसमामध्ये चेपॉक सुपर गिल्लीज या संघाकडून खेळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे पेरियास्वामीला एका डोळ्याने दिसत नसल्याचं देखील समोर आलं आहे.

तो एक उत्तम गोलंदाज असण्याबरोबरच चांगला क्षेत्ररक्षकही आहे. चेंडूच्या वेगावर त्याचे कमालीचे नियंत्रण असून धिम्या गतीचे तसेच जलद चेंडूही अगदी उत्तमप्रकारे टाकतो.

पेरियास्वामीने कराईकुडी कलाई या संघाविरोधातील सामन्यामध्ये तीन षटकांमध्ये ९ धावा देत २ बळी घेतले होते. तर यंदाच्या मोसमामध्ये पेरियास्वामीने ५.७३ च्या सरासरीने चार सामन्यांमध्ये ७ बळी घेतले आहेत.

… तर चंद्राबाबूंना होऊ शकतो दोन वर्षांचा तुरुंगवास

सलाम या रणरागिणीला ! पतीच्या मृत्यूनंतर स्वतः होणार लष्करात दाखल