त्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत फैसला

टीम महाराष्ट्र देशा: कोकण आयुक्त आज किंवा उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा फैसला देण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे.

Loading...

गेल्या तीन महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. आता त्यावर कोकण आयुक्त यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. कारण हे नगरसेवक पात्र झाल्यास हे नगरसेवक शिवसेनेसाठी काम करतील. पण जर अपात्र ठरले तर पुढे काय हा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहणार आहे.

कोण आहेत हे नगरसेवक ?
अर्चना भालेराव
परमेश्वर कदम
अश्विनी मतेकर
दिलीप लांडे
हर्षल मोरे
दत्ताराम नरवणकरLoading…


Loading…

Loading...