FIFA World Cup 2018: उद्यापासून रंगणार महासंग्राम

रशिया(मेक्सिको): रशियात फुटबाँल फिफा विश्वचषक उद्यापासून रंगणार आहे रशियाची राजधानी मोस्कोतल्या ल्युझीनिकी मैदानावर या विश्वचषकाचा उध्दघाटन सोहळयाचे आयोजन करण्यात येत आहे.

Rohan Deshmukh

ब्रिटीश पॉपस्टार रॉबी विल्यम्सनचा परफॉर्मन्स हे उद्याच्या उध्दघाटन सोहळयाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा २१ वा फुटबाँल विश्वचषक असून या विश्वचषक स्पर्धेत जगभरातील एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. हे संघ आठ गटात विभागले जातील, प्रत्येक गटात चार संघ असतील. प्रत्येक गटातील दोन संघ नॉकआउट फेरीत प्रवेश करतील.

स्पर्धेचा पहिला सामना रशिया आणि सौदी अरेबिया या दोन संघामध्ये खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेला अतिरेकी आणि हुल्लडबाजांचा धोका लक्ष्यात घेता, मेक्सिकोमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जगभरातील फुटबाँलप्रेमींमध्ये या स्पर्धेमुळे आनंदाच वातावरण आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...