रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ ! अजून एक तक्रार दाखल

मुंबई : रिपब्लिक टीव्ही आणि राज्य सरकार यांच्यात मागे झालेला संघर्ष, अर्नब गोस्वामीचे अरेरावी सुरात कसेही ओरडणे हे नित्याचेच होते पण त्याला आता जरब बसण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून रिपब्लिक टीव्हीचे वार्ताहर,अँकर आणि चॅनेलच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतल्या ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिपब्लिकची अँकर आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक शिवानी गुप्ता, उपसंपादक सागरिका मित्र, उपसंपादक शावन सेन, कार्यकारी संपादक नारायणस्वामी आणि संपादकीय कर्मचारी, तसेच न्यूजरुम प्रभारी, संबंधित न्यूज प्रसारित करण्यासाठी संपादकीय कर्मचारी आणि न्यूजरूम प्रभारी व इतर यांच्याविरोधात पोलिसाची बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-१ च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या वृत्तामुळे मुंबई पोलिस दलाची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलीस आयुक्तांची बदनामी करण्यात आल्यावरून पवार यांनी याप्रकरणी तक्रार केली.

महत्वाच्या बातम्या-