मुंबई : बॉलीवूड स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्नाच्या तिसऱ्या महिन्यातच प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसाठी शेअर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जगभरातून या जोडप्याचे चाहते अभिनंदन करत आहेत. दरम्यान, कंडोम कंपनी ड्युरेक्सनेही या जोडप्याचे खूप मजेदार पद्धतीने अभिनंदन केले आहे. ड्युरेक्सचे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ड्युरेक्सने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे अभिनंदन करण्यासाठी रणबीर कपूरचे ‘चन्ना मेरे आ’ गाणे वापरून एक मजेदार ट्विट केले आहेत. ड्युरेक्सने ट्विट केले, “महफिल में तेरी हम तो क्लियरली नहीं थे… बधाईयां”. आता ड्युरेक्सचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या ट्विटवर लोक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
The JOMO is REAL! Congratulations Alia & Ranbir. 😍🤩
Click the link to buy: https://t.co/wndXfd2tub#RanbirAlia #Ralia #AliaBhatt pic.twitter.com/TvQGmoMrUn— Durex India (@DurexIndia) June 27, 2022
कंपनीची ही स्टाइल लोकांना खूप आवडली. लोकांनी ड्युरेक्सच्या सोशल मीडिया मॅनेजरचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले की, तुम्ही असे मार्केटिंग कसे करता? कंटेंट रायटरला प्रमोशन मिळायला हवं असं कुणीतरी लिहिलं आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेचा विषय बनले आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<