मुंबई : आयपीएल मीडिया हक्कांच्या (IPL Media Rights) बाबतीत मागील वर्षांचे विक्रम मोडित निघाले आहे. या वर्षात आतापर्यंतच्या सर्वाधिक रकमेत मीडिया हक्क विकले गेले आहेत. टीव्ही आणि डिजिटल हक्क ४४,०७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. बीसीसीआयने पुढील पाच वर्षांसाठीच्या माध्यम हक्कांचा दोन दिवस ई-लिलाव केला. यादरम्यान आयपीएलशी संबंधित विनोदी मीम्सही समोर आले आहेत. आता आयपीएलसाठी काय काय करावे लागेल, याचा अंदाज नेटकरी सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून सांगत आहेत.
टीव्हीचे हक्क २३,५७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तर डिजिटल अधिकार २०,५०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. टीव्हीचे हक्क सोनी टीव्हीने विकत घेतले आहेत. रिलायन्स-व्हायकॉमला डिजिटल अधिकार मिळाले आहेत. मागील पाच वर्षांच्या तुलनेत पुढील पाच वर्षांसाठी बोर्डाला मोठी रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयला भारतीयांना टीव्ही आणि डिजिटल अधिकारांच्या विक्रीसह आगामी पाच वर्षांच्या चक्रात ४१० सामन्यांसाठी ४४,०७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आयपीएलमध्ये पुढील ३ हंगामांसाठी ७४ सामने असतील, ज्यामध्ये शेवटच्या दोन वर्षात गेल्या ते ९४ प्रति हंगाम वाढवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
Hotstar out from bidding #IPLMediaRights
my friend with 1 year subscription :#IPL2023 pic.twitter.com/qYlOVOrRU2— Gk (@ggkhnr) June 12, 2022
Hotstar Refused to bid for #IPLMediaRights
Me & my friend with 1 year subscription : pic.twitter.com/X6CwvxCntM— dp (@dhruv1n) June 12, 2022
Sony Max IPL Couldn't forget till now ❤️😇 #IPLMediaRights #iplmediarights pic.twitter.com/GetojKEhkb
— Viratian 18 (@iambaljeetVk18) June 6, 2022
Star sports reaction when sony win the #IPLMediaRights bid pic.twitter.com/3wU2sselFR
— Saurav Anand (@Sauravanand0932) June 11, 2022
Hotstar Refused to bid for IPL Rights
Me with 1 year subscription-#IPLMediaRights @DisneyPlusHS #IPL2023 #IPL pic.twitter.com/LsCXVdbrIH
— MaNjeeT AGgaRwAL🇮🇳 (@MaNjeeTAGgaRwA5) June 11, 2022
२०२३-२७ कालावधीसाठी आयपीएल मीडिया हक्कांचे एकूण मूल्य ५०,००० कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची अपेक्षा आहे, जे २०१७ मध्ये स्टार इंडियाने टीव्ही आणि डिजिटल अधिकारांसाठी दिलेल्या पैशाच्या तीन पट जास्त आहे. स्टारने शेवटचे मीडिया हक्क जवळपास १६.३७४.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
मीडिया अधिकार चार पॅकेजेसमध्ये विभागले गेले आहेत. पॅकेज ए मध्ये प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी रुपये असतील. तर पॅकेज बी ची किंमत प्रति सामन्यासाठी ३३ कोटी रुपये असेल. सी आणि डी ची रक्कम अनुक्रमे ११ कोटी रुपये आणि प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी रुपये असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<