‘जो लाना, दो लाना’ सोनू सूदचे चाहत्याला मजेशीर उत्तर

sonu sud

मुंबई : राज्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या हजारो परराज्यातील मजुरांसाठी सोनू सूद हा देवदूतच बनला होता. त्याने स्वखर्चातून हजारो परप्रांतिय लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी सोनू सूदने बसची सोय केली होती. यानंतर त्याचे देशभरात कौतुक झाले, ‘रिअल हिरो’ म्हणून त्याला आता ओळखले जाऊ लागले आहे.

एवढेच न्हवे तर विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या मायदेशी परतण्यास मदत केली होती. सोनू सूदच्या या कारकीर्दीमुळे देशभरात त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. सोनू सूदला त्याचे चाहते सोशल माध्यमातून आपल्या आगळया वेगळ्या इच्छा सांगत असतात यातच त्याच्या एका चाहित्याने सोनूला भेटणायची इच्छा व्यक्त केली आहे.

अशा या दानशूर हिरोला प्रत्येकाची भेटणायची इच्छा आहे. सोनूच्या चाहत्याने भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर. या चाहत्याला सोनूने असे काही उत्तर दिले की, चाहते पुन्हा एकदा या हिरोच्या प्रेमात पडले.

सोनूजी मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही का? कदाचित माझी ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. तरीही फक्त एकदाच ‘आपण भेटू’, असे म्हणा,’ असे ट्विट नीरज कुमार नामक एका चाहत्याने केले. दिलदार सोनूने यावर भन्नाट रिप्लाय दिला. ‘आपण नक्की भेटू पण तू जे लिंबू पाणी पित आहेस ते तुला माझ्यासाठी घेऊन यावे लागेल,’ असे सोनूने यावर लिहिले.

महत्वाच्या बातम्या:-