भय्यूजी महाराजांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; देशभरातील अनुयायी इंदूरमध्ये दाखल

blank

इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मंगळवारी त्यांनी स्वत;वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली होती. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळी ९ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आयुष्यातल्या ताणतणावाला कांटाळलो आहे

भय्यूजी महाराज यांनी एवढे टोकाचे पाउल उचलल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त केल जात आहे. दरम्यान, त्यांच्या रूममधून सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये त्यांनी ‘आपण आयुष्यातल्या ताणतणावाला कांटाळलो आहे, हे ताणतणाव आता सहन होत नसल्याच’ लिहिले आहे, तसेच आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असही त्यांनी या चिट्ठीत लिहील आहे.

मॉडेलिंग ते अध्यात्मिक गुरु
जकारण असो कि बॉलीवूड प्रत्येक क्षेत्रात भय्यूजी महाराज यांना मानणारी व्यक्तींची संख्या मोठी आहे. भय्यूजी महाराजांचं नाव डॉ. उदयसिंह देशमुख असून, त्यांचा जन्म 29 एप्रिल 1968 मध्ये मध्यप्रदेशातील सृजलपूरमध्ये झाला त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. ते एक यशस्वी मॉडेल्स होते. सियाराम सारख्या जगविख्यात ब्रांडसाठी त्यांनी मॉडेलिंग केले होते. पुढे वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना अध्यात्मिक साक्षात्कार झाल्याच बोलल जात. तेथून त्यांनी आध्यात्माकडे झोकून देत 1996 मध्ये त्यांनी सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना केली.