शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरच्या सीमे वरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन दहशद वाद्यांंचा खात्मा केला या, चकमकीवेळी भारताच्या चार जवानांना वीरमरण आले होते. शहिदांमध्ये के.पी मेजर कौस्तुभ राणे आणि तीन जवानांचा समावेश होता.

दरम्यान शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज मीरा रोड येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात आले. मेजर राणे यांचे पार्थिव श्रीनगरवरून दुपारी सव्वादोन वाजता विमानाने दिल्लीत आणण्यात आले. तेथे त्यांना लष्कराने मानवंदना दिली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता त्यांचे पार्थिव मुंबईला विमानाने रवाना झाले. मुंबई विमानतळावर सायंकाळी ६.३०च्या दरम्यान ते पोहोचले. मालाड येथील लष्कराच्या शवागृहात मेजर राणे यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. तेथे अंत्यदर्शनानंतर सकाळी १० वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील.

Loading...

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज राणे कुटुंबीयांची भेट घेतली. सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून शहीद मेजर कौस्तुभ यांचे वडील प्रकाश राणे यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणे परिवाराचे सांत्वन केले. ते पुढे म्हणाले, मेजर कौस्तुभ यांच्या शौर्याला माझ्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी मानवंदना देतो. संपूर्ण शिवसेना परिवार हा सदैव तुमच्या पाठीशी आहे. कौस्तुभ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांचा पराक्रम पुढच्या पिढय़ांसमोर राहावा यासाठी त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक मीरा-भाईंदरमध्ये उभारण्यात येईल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ