निलंगा मतदारसंघासाठी २५/१५ योजनेअंतर्गत ८ कोटी निधी मंजूर

टीम महाराष्ट्र देशा (प्रा.प्रदीप मुरमे) – राज्याचे कौशल्य विकास तथा कामगार मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या निलंगा या मतदारसंघासाठी २५/१५ या योजनेअंतर्गत तब्बल ८ कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला आहे.आपला मतदारसंघ असलेल्या निलंगा या मतदारसंघाच्या विकासासाठी बांधील असलेले ना.संभाजीराव पाटील निलंगेकर विकास निधी खेचून आणण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत असतात.

राज्याचे मंञी व मुख्यमंञ्यांचे अत्यंत निकटवर्तीय मंञी असल्याने संभाजीराव पाटील यांच्या शब्दाला शासन दरबारी विशेष महत्व आहे.त्यामुळे निलंगा मतदारसंघासाठी मागील ४ वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आला आहे.

ना.पाटील यांच्या पाठपुराव्यातून सन.२०१८-२०१९ या वर्षात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा कामासाठी ८ कोटी एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे.या निधीमुळे मतदारसंघातील ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. निलंगा मतदारसंघाच्या इतिहासात एवढा मोठा भरीव निधी प्रथमच मंजूर झाला आहे.

नेते ना.संभाजीराव पाटील हे केवळ पोकळ गप्पा मारुन खोटे आश्वासन देत नाहीत. प्रत्यक्ष कृतीतून विकास साधणारे नेते आहेत. तरी मतदारसंघातील जनतेने आगामी काळात विकासाची दूरदृष्टी असलेल्या या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष यांनी एका प्रसिद्धीपञकाव्दारे केले आहे.