मतदारसंघातील विकास अनुशेष दूर करण्यासाठी भरीव निधी द्यावा: आ. काळे

टीम महाराष्ट्र देशा – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी असी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी केली.

आ. काळे बैठकीत म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या दुष्काळी गावातील रांजणगाव देशमुखसह, अंजनापूर, बहादराबाद, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव अशा सात गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिलाची थकबाकी वाढत जाऊन योजना बंद पडते. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Loading...

दुष्काळी गावांतील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा, यासाठी रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर प्लँट द्यावा, या योजनेच्या साठवण तलावाचे दुरुस्तीसाठी निधी द्यावा, तालुक्यातील ३६ नळ पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध करून द्यावे, नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, या मागण्या आ. काळे यांनी यावेळी केल्या.

तसेच श्रीक्षेत्र मयुरेश्वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला असल्याची माहितीही काळे यांनी यावेळी दिली. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरात सुरु करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी, शाळा दुरुस्तीसाठी भरघोस निधी मिळावा, अशाही मागण्या काळे यांनी केल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात