परभणी : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १२ किलोमिटर लांबीच्या रुंदीकरणासाठी २० कोटींची मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली होती. ती मागणी गडकरी यांनी मंजूर केल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितली. या माध्यमातून जिंतूरच्या रस्त्याचे भाग्य आता उजळणार आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातील १२ किलोमिटर लांबीच्या रस्त्यांच्या रंदीकरणासाठी 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याबद्दल बोर्डीकर यांनी दिल्ली येथे भेट घेवून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले आहेत. काही दिवसांपुर्वी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन जिंतूर विधानसभा मतदार संघातील जवळपास 12 कि. मी. लांबीच्या बोरी जंक्शन ते कान्हड पाटी या अंदाजे 20 कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या रूंदीकरणासह सुधारणा कामास केंद्रीय मार्ग निधीमधून मंजुरी देण्याची मागणी बोर्डीकर यांनी केली होती.
कोरोनाचे संकट बळावल्याने कामे मंजुर होण्यास अडचण आली. परंतू या बाबतचा पाठपुरावा सुरूच होता. मोरेगाव – हातनुर- वालुर – कौसडी – बोरी – वस्सा हा 12 किमी अंतर रस्त्यासाठी रूंदीकरण, सुधारणेची कामे मंजूर झालेली आहेत. नितीन गडकरी यांच्याकडून उर्वरीत कामानांही पुढील टप्प्यात मंजुरी देण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- खोटं बोल पण रेटून बोल, अशी भाजपची भूमिका- नाना पटोले
- पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात अजितदादा राबवणार ‘सांगली पॅटर्न’ ?
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
- दृष्टचक्र! पन्नास रुपये किलो विकणारा टोमॅटो मिळतोय अवघ्या पाच रुपयांत
- कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…