मुख्यमंत्र्यांना शिवसंग्राम संघटनेचा पूर्ण पाठिंबा- विनायक मेटे

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं. पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकरणीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते.

आगामी काळात सरकारसोबत रहायची की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठांच्या विरोधात असल्याचं अजिबात वाटत नाही. महायुतीममध्ये शिवसंग्रामवरच अन्याय झाला आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकार सोबत असल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.