जाणून घ्या मुंबई-पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

जाणून घ्या मुंबई-पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

इंधन

मुंबई : भारतीय इंधन तेल कंपन्यांनी आज जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलबाबत (Fuel Price) लोकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्‍ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.

आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये, डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये आहे. कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये असून पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.

दरम्यान, दिवाळीच्या अगोदर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ आणि १० रुपयांनी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता भाजपनेही राज्य सरकारने इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणताही दिलासा दिला नाही.

महत्वाच्या बातम्या