इंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच

टीम महाराष्ट्र देशा : इंधन दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या जनतेला गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीपासून सुटका मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा इंधन दरकपातीचे अच्छे दिन संपून दरवाढीचा भडका सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

मुंबईत आज पेट्रोल १७ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ७६.३६ रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही २० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ६८.२२ रुपयांवर गेला आहे.

दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर १७ पैशांनी तर डिझेलचे दर १९ पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे ७०.७२ रुपये आणि ६५.१६ रुपये मोजावे लागतील.