इंधन दरवाढीने जनता अक्षरशः हैराण झाली आहे, नितीन गडकरी यांनी केलं मान्य

nitin-gadkari

टीम महाराष्ट्र देशा : ”इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली असून यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे”,अशी प्रतिक्रिया आता खुद्द केंद्रीय नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशभरात सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ही बाब गडकरी यांनी मान्य केली आहे.

मुंबईमध्ये मंगळवारी पेट्रोलचे प्रतिलिटर दर 89.54 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर 78.42 रुपये एवढे होते. राज्यातील जवळपास सहापेक्षा अधिक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली होती. इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जनतेला जगणं कठिण झाले आहे. याच समस्येवर ब्लूमबर्ग इंडिया इकनॉमिक फोरममध्ये संबोधित करताना नितीन गडकरी यांनी भाष्य केले.

”इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थिती सर्वसामान्यांना अन्य समस्यांचाही सामना करावा लागत आहे”, असे त्यांनी यावेळेसे म्हटले. दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पण ही माहिती मिळण्याचे स्त्रोत कोणते, हे सांगणे त्यांनी टाळले.

वाचा का मानले सोनिया गांधी यांनी नितीन गडकरी यांचे आभार